सामाजिक सामंजस्य आणि शिक्षणाची भूमिका सायली दुबाश ०२ सप्टेंबर २०२०

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड यांच्या दुर्दैवी मृत्यूने जगभरात विविध प्रकारे हळहळ आणि संताप व्यक्त करण्यात आला आहे. कृष्णवर्णीय आणि सवर्ण यांच्यातील वर्षानुवर्षे चालत असलेला संघर्ष या घटनेमुळे अतिशय ठळकपणे पुढे आला. जगभरात ‘सामाजिक सामंजस्य’ या विषयाला पुन्हा एकदा केंद्रस्थानी ठेऊन त्यावर काम करण्याची कशी गरज आहे यावर चर्चा सुरु झाली. या पार्श्वभूमीवर बहाई अकादमी या पाचगणी स्थित शैक्षणिक संस्थेच्या पुढ…